आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:आदिवासी वसतिगृहामधील प्रवेश रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे कुटुंबासह उपोषण

शिंदखेडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनाही दिले निवेदन

येथील संत गुलाब महाराज अनुसूचित जमाती मुलांचे वसतिगृहात विद्यार्थी अविनाश दिलीप कोळी व हितेश दिलीप कोळी यांचा प्रवेश नाकारला गेला म्हणून बुधवारपासून बेमुदत उपोषणाला विद्यार्थी पालक आई सरलाबाई दिलीप कोळी समवेत बसले आहेत. त्यांना शिंदखेडा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तालुका अध्यक्ष मिलिंद पाटोळे व वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नामदेव येळवे यांनी पाठिंबा दिला आहे.

शिंदखेडा येथे संत गुलाब महाराज अनुसूचित जमाती मुलांचे वसतिगृह सुरू आहे. या वसतिगृहात एस.टी. प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना कोट्याप्रमाणे प्रवेश दिला जातो. असे असताना सन २०१८-१९ पर्यंत अविनाश दिलीप कोळी व हितेश दिलीप कोळी या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होते. पण गेल्या दोन वर्षांपासून आदिवासी प्रकल्प विभागाच्या धुळे कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचे योग्य संविधानिक कारण न देत वसतिगृहाने प्रवेश नाकारला गेला आहे. म्हणून विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन व ऑफलाइन फॉर्मदेखील वसतिगृहाने भरून घेतले आहे. त्यामुळे प्रवेश नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच दोन वर्षांची डीबीटी व प्रवेश पूर्ववत करावा या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रकल्प अधिकारी, पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. याप्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मिलिंद पाटोळे, सहसचिव पंकज मोहिते, शहराध्यक्ष राहुल महिराळे, मोहन पाटोळे, गणेश पाटोळे, शरद कोळी, रवींद्र गिरासे, नीलेश पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष नामदेव येळवे, प्रवीण येळवे, आनंदा शिरसाठ, रोहन कोळी यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.

बातम्या आणखी आहेत...