आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदारी:तावखेडात विद्यार्थ्यांनी स्वीकारली आता वृक्ष संगोपनाची जबाबदारी

शिंदखेडा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे संचालक अमित पाटील यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तावखेडा येथील वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम राबवण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी वृक्ष संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पी.पी. महिरे-वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा झाल्या. या वेळी वृक्षारोपणाविषयी एन. पी. भिलाणे यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्याने एक रोपटे लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. एस.एस. पाटील यांनी निबंध स्पर्धेचे नियोजन केले. सी. झेड. कुवर यांनी वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन करून स्पर्धा घेतली.

चित्रकला स्पर्धेचे आयोजन शिक्षक ए.के. सावंत यांनी केले. मुख्याध्यापिका पी. पी. महिरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. एस. एस. पाटील, सी. झेड. कुवर, मंगला कुंवर, ए.के. सावंत, एन. पी. भिलाणे, पी.एच. लांडगे, नितीन पाटील आदी उपस्थित हाेते. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजावे यासाठी प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...