आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद‎:पिंपळादेवी शाळेत सूर्यनमस्कार‎ स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी माध्यमिक व‎ उच्च माध्यमिक विद्यालयात रथसप्तमी निमित्त योग‎ विद्याधाम व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने रथ‎ सप्तमी निमित्ताने १०८ सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांचे आयोजन‎ करण्यात आले. यात विद्यालयातील दीडशे विद्यार्थ्यांनी‎ सहभाग घेऊन मंत्रासह १०८ सूर्यनमस्कार सादर केले.‎ उत्कृष्ट सूर्यनमस्कार सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना योगा मॅट‎ भेट देण्यात आली.

अध्यक्ष विनोद गुजराती यांच्यातर्फे‎ मुलांना खाऊ वाटप केला. योगा शिक्षिका रंजना मयूर, प्रीती‎ जोशी, योगेश शिक्षक प्रकाश पाठक यांनी परिश्रम घेतले.‎ प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष विनायक शिंदे, राधेश्याम‎ गिंदोडिया, दिलीप कुचेरिया, शिल्पाताई शिंदे, मुख्याध्यापक‎ आर. व्ही. पाटील, उपमुख्याध्यापक के. आर. सावंत,‎ पर्यवेक्षक एस. एस. पाटील, संचालक एस. बी. पाटील,‎ विलास बोरसे उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. बी.‎ कापडणीस यांनी केले. प्रात्यक्षिकासाठी एस. एम. पाटील,‎ आर. बी. शिंदे, वाय. डब्ल्यू. वाघ यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...