आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाची कमान:कोरोना संकटानंतर परीक्षेला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांनी केली चमकदार कामगिरी; दहावीच्या परीक्षेत शाळांनी गाठली शंभरी

धूळे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवकर विद्यालयाचे यश
विरदेल येथील देवकर विद्यालयाचा निकाल ९५.०३ टक्के लागला. शाळेत हर्षदा तावडेने ८६.४० टक्के गुण मिळवत प्रथम, दर्शना जाधवने ८५.८० टक्के गुणांसह द्वितीय, गुंजन बेहरेने ८५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. गुणवंत विद्यार्थ्यांना ॲड. संभाजीराव देवकर, सचिव ॲड. भरत देवकर, प्राचार्य जे. एस. पाटील, एस. एस. गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

‘सिंधुरत्न’ चा १०० टक्के निकाल
शहरातील सिंधूरत्न इंग्लिश मिडिअम स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेतून हिनीषा खिलवाणीने ९१.८० टक्के गुण मिळवत प्रथम, करिना जिसेजा व तनुजा पाटीलने ९१.४० गुण मिळवित द्वितीय तर भूमी अटलाणीने ९०.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांना सुरेश कुंदानाणी, तनुकुमार दुसेजा, राजकुमार तोलाणी, जमनू तोलाणी, जेठानंद हासवाणी, प्राचार्य आमीर खान, शालिनी मंदाण यांचे मार्गदर्शन लाभले.

विसपुते विद्यालयाचे यश
शहरातील डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेतून कल्याणी बच्छावने ८०.८० टक्के गुण मिळवत प्रथम, वैशाली मगरने ८० टक्के गुण मिळवत द्वितीय, सोनाली मोरेने ७७.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना एस. आर. पाटील, डी. डी. पवार, एस. बी. भदाणे, ए. के. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

छत्रपती शिवाजी हायस्कूलचे यश
शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूलचा निकाल ८९.१८ टक्के लागला. शाळेतील हिमांशू पवारने ७७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. लोकेश सोनवणेने ७६.३० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. शाळेतील ३७ पैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांना माजी मंत्री रोहिदास पाटील,आमदार कुणाल पाटील, डाॅ. भाईदास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

जनता हायस्कूलचे यश
शिंदखेडा येथील जनता हायस्कूलमधील निर्मल शिंदेने ९५.८० टक्के गुण मिळवत शिंदखेडा केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला. उत्कर्ष कचवे ९४.२० टक्के गुण मिळवत द्वितीय, तेजस्विनी पाटीलने ९३.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. मराठी माध्यमातून रुपाली सोनवणेने ८५.८० टक्के गुण मिळवत प्रथम, नंदीनी जाधवने ८५ टक्के गुण मिळवत द्वितीय, नितीन वळवीने ८४.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील, सचिव मीना पाटील, गोरख पाटील, देवेंद्र पाटील, प्राचार्य एम. डी. बोरसे, उमेश देसले यांचे मार्गदर्शन लाभले.

दिव्यांग विद्यार्थी ही चमकले
शहरातील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७ टक्के लागला. शाळेतून पूजा देवरेने ८१.८० टक्के गुण मिळवत प्रथम, पियूषा राजपूतने ८१.४० टक्के गुण मिळवत द्वितीय, धनश्री राजपूतने ८०.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये मोहिनी बोरसेने ८९.४० टक्के, शन्नोबी कलीम ८८.८० टक्के, सुमीर कुरेशी ८७.२० टक्के, हर्षदा पगारे ८६.६० टक्के, चेतना आल्हार ८८ टक्के, हर्षवर्धन जमानेकर ८६.८० टक्के, अजय वसावे ८६.८० टक्के तर वैष्णवी मोरे ७९.३९० टक्के गुण मिळवले. गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, कार्याध्यक्ष नरेंद्रसिंग सिसाेदीया, विजयसिंग सूर्यवंशी, प्रकाशसिंग जाधव, मुख्याध्यापिका सुचेता भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले.

धुळे | येथील श्री मयुर शैक्षणिक ट्रस्टच्या श्री नानासाहेब झुलाल भिलाजीराव पाटील हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेतून १२६ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. ते सर्व उत्तीर्ण झाले. शाळेत प्रथम क्रमांक आनंद रमेश विभांडिक (९७.६०टक्केे), द्वितीय सलोणी किशोर ठाकरे (९५.४०टक्के), तृतीय आश्विनी सुनिल धातकर व पियुष प्रशांत बोरसे (९३.८० टक्के), चैताली वितेश जाधव (९१.६०टक्के) , रितुजा दिनेश पाटील व आश्विनी नितीनभाई जाधव (९०.२० टक्के), नंदिनी लखेसिंग गिरासे व आदिती सुरेश बाविस्कर (९० टक्के) यांनी मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांना मंडलिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक तुषार देसले, मयुर हायस्कुलचे मुख्याध्यापक यु. डी. तोरवणे, शिक्षक एस. एम. देसले, यु. पी. देसले, एस. एस. पाटील, ए. डी. कोठावदे, पी. डी. पाडवी, एम. यु. पवार, व्ही‍. जे. निकम, व्ही. व्ही. पाटील, ए. एम. जोशी. ए. आर. नेरकर अादींचे मार्गदर्शन लाभले.

शिरपूर | तालुक्यातील अहिल्यापूर येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेतील १९ विद्यार्थी ९० टक्केपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले. तसेच ३० पैकी २८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. शाळेत वैभव लक्ष्मण पाटीलने ९५.८० टक्के गुण मिळवून प्रथम, सुमित प्रकाश मोरे, प्रज्ञा संग्रामसिंग बनकर, परेश नरेंद्र गोसावी यांनी ९४.२० टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय, तेजस्विनी देवीसिंग गिरासे व चैताली रणजीतसिंग गिरासे यांनी ९३.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार अमरीश पटेल, कार्याध्यक्ष भूपेश पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकर चव्हाण, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा, मुख्याध्यापक पी. एन. गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

धुळे। मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९.१६ टक्के लागला. शाळेतून २४० प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विशेष प्राविण्यासह २०७ तर प्रथम श्रेणीत २७ व द्वितीय श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणारे ३५ विद्यार्थी आहे. विद्यालयात प्रथम क्रमांक रिया विनोद पाटील (९५.४०टक्के), द्वितीय पूजा अनिल चौधरी (९४.६० टक्के), तृतीय यश भटू मराठे (९४ टक्के ), चतुर्थ यश देविदास गोसावी (९३.६०टक्के), कल्याणी दीपक पाटील ९३. ४० टक्के गुण मिळवून विद्यालयात पाचवा क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष विनायक शिंदे, मुख्याध्यापक आर. व्ही. पाटील, उपमुख्याध्यापक के. आर. सावंत, पर्यवेक्षक एस. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

निजामपूर केंद्रामध्ये कृष्णा पाटील प्रथम

निजामपूर | निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६.१० टक्के लागला. निजामपूर केंद्रातून कृष्णा मनोज पाटीलने ९५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. यश प्रवीण राणेने ९४.२० टक्के गुण मिळवून द्वितीय, स्नेहांकिता नितीन राणेने ९४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांना प्राचार्य आर. जी. सोंजे, निवृत्त प्राचार्य जे. पी. भामरे, उपमुख्याध्यापक पी. जे. शाह, पर्यवेक्षक बी. आर. गावित, के. ओ. लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दशरथ पाटील, जे. के. शाह, आदर्श कला महाविद्यालयाचे अध्यक्ष अॅड. शरदचंद्र शाह, शालेय समितीचे अध्यक्ष अजितचंद्र शाह, सचिव नितीन शाह यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाटील शाळेचा लागला १०० टक्के निकाल
तऱ्हाडी | येथील कै. आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेतील सर्व ४७ विद्यार्थी पास झाले. वैभव रवींद्र अहिरेने ९०.४० टक्के गुण मिळवून प्रथम, गोपाल राजेंद्र भारतीने ८९. ६० टक्के गुण मिळवून द्वितीय, प्रितम सुनील भामरेने ८८. ८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. सर्वांना संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे, उपाध्यक्ष निंबा भामरे, सचिव विजय भामरे, कार्याध्यक्ष सुधीर भामरे, मुख्याध्यापक एन. एच. कश्यप, भावनेश सोनवणे, ए. के. पाटील, प्रवीण शिंदे, रावसाहेब चव्हाण, डॉ. प्रा. दिलवसिंग गिरासे, सरपंच जयश्री धनगर, उपसरपंच उजनबाई अहिरे, सुनील धनगर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील अन्य विद्यार्थ्यांनीही परीक्षेत चांगले गुण मिळवल्याची माहिती शाळा प्रशासनातर्फे देण्यात आली.

पिंपळनेरसह दिघावेच्या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
पिंपळनेर | येथील पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मवीर. आ. मा. पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. शाळेत जय राजेश दहिकरने ९५ टक्के गुण मिळवून प्रथम, नीरज सतीश कोतकरने ९४.८० टक्के गुण मिळवत द्वितीय, श्रद्धा देवेंद्र पाटीलने ९४.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवला. संस्थेचे अध्यक्ष आर. एन. शिंदे, उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे, सचिव आत्माराम सोनू बिरारीस, कॉलेज कमिटीचे चेअरमन धनराज जैन, शालेय समितीचे चेअरमन सुभाष जैन, एच. आर. गांगुर्डे, शालेय समितीचे व्हाईस चेअरमन डॉ. विवेकानंद शिंदे, प्राचार्य एम. ए. बिरारीस यांचे मार्गदर्शन लाभले.

दिघावे विद्यालयाचा ९६ टक्के निकाल
साक्री तालुक्यातील दिघावे येथील पिंपळनेर एजुकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९६.२२ टक्के लागला. शामली गोकुळ कुवरने ८८.२० टक्के मिळवत प्रथम, मेघना यशवंत महालेने ८७.६० टक्के मिळवून द्वितीय, प्रवीण राजेंद्र पाटीलने ८७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवल्याची माहिती शाळेकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...