आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:साक्री शहराच्या विकासासाठी भरीव निधी द्यावा ; नगराध्यक्षा

साक्री10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री शहराचा गेल्या अनेक वर्षांपासून थांबलेला विकास व्हावा व त्या विकासाला गती मिळावी यासाठी विविध विकास कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साक्री नगरपंचायत नगराध्यक्षा जयश्री हेमंत पवार यांनी केली आहे. याविषयीचे निवेदन फडणवीस यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, साक्री शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक म्हणून सर्वत्र बंदिस्त भूमिगत गटारी व्हाव्यात, अबालवृद्ध व महिला वर्गासाठी शहरातील सर्व वाॅर्डात असलेले ओपन स्पेस सुशोभिकरण व्हावे, चांगले रस्ते तयार व्हावेत, शहरातील वेगवेगळी विकास कामे व्हावीत, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याप्रसंगी उपाध्यक्ष बापूसाहेब गिते, बांधकाम सभापती ॲड. गजेंद्र भोसले, पाणीपुरवठा सभापती रेखा सोनवणे, महिला बालकल्याण सभापती जयश्री पगारिया, आरोग्य सभापती मनीषा देसले, नगरसेविका उषा पवार, संगीता भावसार, नगरसेवक दीपक वाघ, प्रवीण निकुंभे, अॅड. पूनम काकुस्ते, विजय भोसले, हेमंत पवार, आबा सोनवणे, विनोदकुमार पगारिया, मनीष गिते, स्वप्निल भावसार, प्रवीण विसपुते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...