आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्लेखनीय यश:बोरद येथील विद्यार्थ्यांचे आर्किटेक्ट ड्राफ्ट्समन अभ्यासक्रम परीक्षेत यश

बोरद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथील आशा या महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या अंतर्गत एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दोन वर्षीय आर्किटेक्ट ड्राफ्ट्समन पदविका अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये बोरद येथील प्रतिभा व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. नेहा राज ढोडरे या विद्यार्थिनीने ८९.२२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या निकालात प्रमोद दत्तू चौरे या विद्यार्थ्याने ८८ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर सिंग्या दमन्या पाडवी या विद्यार्थ्याने ८७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ ढोडरे, सचिव प्रतिभा ढोडरे, तळाेदा शासकीय आयटीआयचे प्राचार्य कवाडकर, शासकीय तांत्रिक विद्यालयाचे खेमोत, ठुबे, प्राचार्य राज ढोडरे, अनिकेत ढोडरे, दिनेश पाटील, राहुल ढोडरे, हर्षल पाटील, अभिषेक चौधरी, लक्ष्मण साळवे, राजेंद्र ढोडरे आदींनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...