आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती:एनएमएमएस परीक्षेत मिळवले यश

शिरपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एच.आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना अर्थात एनएमएमएस परीक्षेत यश प्राप्त केले.ही परीक्षा उत्तीर्ण झालेली शाळेतील स्वाती संग्रामसिंग राजपूतला वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती शासनाकडून प्राप्त होणार आहे. शिष्यवृत्ती रक्कम तिला बारावीपर्यंत मिळेल.

तसेच छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यालयातील एकूण सहा विद्यार्थिनींना वार्षिक रुपये नऊ हजार शिष्यवृत्ती बारावीपर्यंत मिळेल. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनींमध्ये मानसी मनोहर पाटील, जान्हवी कैलास पाटील, मयूरी सुनील पाटील, रक्षा दिलीप पाटील, नंदिनी किशोर पाटील, यशस्वी शरद पाटील यांचा समावेश आहे. सर्वांना संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार अमरीश पटेल, कार्याध्यक्ष भूपेश पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, प्राचार्य आर.बी. पाटील, जे पी. पाटील, जी. के. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...