आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांचे केले समुपदेशन:तीन बालविवाह रोखण्यात यश

धुळे‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील हरसुणे गावात‎ बालविवाह होणार असल्याची‎ निनावी तक्रार चाइल्ड लाइनच्या‎ हेल्पलाइनवर झाली होती. त्यानुसार‎ जिल्हा महिला व बाल विकास‎ अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण‎ समितीने या तक्रारीची पडताळणी‎ करत तीन बालविवाह रोखले.‎ धुळे तालुक्यातील हरसुणे गावात‎ बालविवाह होणार असल्याची‎ तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा‎ परिषदेच्या मुख्य कार्यकारी‎ अधिकारी बुवनेश्वरी एस व जिल्हा‎ महिला व बाल विकास अधिकारी‎ सचिन शिंदे यांच्या सूचनेनुसार‎ परिविक्षाधीन अधिकारी राकेश‎ नेरकर, जिल्हा बाल संरक्षण‎ अधिकारी सतीश चव्हाण, तृप्ती‎ पाटील, देवेंद्र मोहन, चाइल्ड‎ लाइनच्या प्रतिनिधी प्रतीक्षा शिरसाठ‎ यांच्या पथकाने हरसुणेचे पोलिस‎ पाटील, ग्रामसेवक, सरपंच‎ यांच्याशी संपर्क साधला.

तसेच‎ पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी‎ प्रकरणाची दखल घेत हरसुणे गाव‎ गाठले. मुलगा व मुलगीच्या जन्म‎ दाखल्याची तपासणी केली. ज्या‎ मुलीचा विवाह होणार होता ती १८‎ वर्षापेक्षा कमी असल्याचे आढळून‎ आले. त्यामुळे मुलगा व मुलीच्या‎ पालकांचे समुदेशन केले. त्यांना‎ बालविवाहाचे दुष्परिणाम व बाल‎ विवाह प्रतिबंध अधिनियम २००६‎ नुसार होणाऱ्या कारवाईची माहिती‎ दिली. मुलीच्या वडिलांकडून‎ मुलीचा १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह‎ करणार नाही असे हमीपत्र लिहून‎ घेतले. याच गावात दोन अल्पवयीन‎ सख्ख्या बहिणीचाही एकाच‎ मांडवात विवाह होणार होता. हे‎ दोन्ही बालविवाह रोखण्यात‎ यंत्रणेला यश आले. याच गावात‎ अन्य एका अल्पवयीन मुलाचा‎ साखरपुडा झाल्याची माहिती‎ मिळाली होती. त्यानुसार हा‎ बालविवाह रोखण्यात आला. राकेश‎ नेरकर, सतीश चव्हाण, देवेंद्र मोहन,‎ प्रतीक्षा शिरसाठ, सुनील जावरे,‎ जिल्हा परिषद सदस्य पाटील,‎ सरपंच भीमराव पगारे, ग्रामसेवक‎ एस. आर. उदीकर यांच्या‎ सहकार्याने विवाह रोखले.‎

बातम्या आणखी आहेत...