आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबातील सदस्य:कानबाई माता स्वागताची शिंदखेड्यात जय्यत तयारी

शिंदखेडा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा शहरासह तालुक्यात रविवारी कानबाई मातेचे आगमन होईल. दीड दिवसाच्या उत्सवाची तयारी वेगात सुरू झाली आहे. हा उत्सव माळी, सुतार, शिंपी, सोनार, चौधरी आदी समाजातील नागरिक साजरा करतात. उत्सवासाठी बाहेरगावी असलेले कुटुंबातील सदस्य शनिवारी घरी आले होते.

श्रावण महिन्यात येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई मातेची स्थापना होते. त्यानुसार यंदा उद्या रविवारी कानबाई मातेचे आगमन होईल. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी स्वच्छता केली जाते आहे. तसेच रोटाची तयारी सुरू झाली आहे. कानबाई मातेची स्थापना उद्या रविवारी होईल. तसेच रात्री जागरण केले जाईल. ज्यांनी नवस केला असेल ते नवस फेडतील. तसेच रात्रभर जागरण केले जाईल.

शिंदखेडा येथील सावंत परिवारातर्फे कानबाई उत्सव होणार आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम होतील. त्यामध्ये खान्देशची बुलेट ट्रेन कॉमेडी एक्स्प्रेसचे प्रसिद्ध कलाकार अभिनेते श्याम राजपूत यांचा रविवारी रात्री आठ वाजता कार्यक्रम होणार आहे. या वेळी अहिराणी कलावंत उपस्थित असतील. सोमवारी सकाळी कानबाई मातेला विधिवत निराेप दिला जाईल. कोरोनाचा फैलाव कमी झाल्याने यंदा हा उत्सव उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी शहरातील विविध भागातून विसर्जन मिरवणुका काढण्याचे नियोजन झाले आहे. त्यासाठी काहींनी डीजे ठरवले आहे.

बातम्या आणखी आहेत...