आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाची चाचणी यशस्वी:विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वाहनाची चाचणी यशस्वी; सहा लाख रुपये खर्च करून स्पर्धेसाठी बनवले वाहन

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वाहनाचे सर्व सुटे भाग एकत्र करून मेगा एटीव्ही या वाहनाची निर्मिती केली. हे वाहन खडकाळ व डोंगराळ भागात चालवण्यासाठी उपयोगी आहे. या वाहनाची नुकतीच चाचणी घेण्यात आली.

देवरे महाविद्यालय, विविध विभागातील विद्यार्थी असोसिएशन व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन सहा लाख रुपये खर्च करून या वाहनाची निर्मिती केली आहे. वाहन तयार करण्यास सहा महिने लागले. मेगा एटीव्ही वाहनाची बिलाडी येथील टेकडी परिसरात यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे वाहन मे महिन्यात गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय मेगा एटीव्ही चॅम्पियनशिप स्पर्धेत हर्षल धाकडच्या नेतृत्वाखाली सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहे.

या वाहनाच्या चाचणीप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील, विभागप्रमुख प्रा. डॉ. एस.डी. सूर्यवंशी, प्रा.डॉ.डी.सी. सोनवणे, प्रा. निखिल देशमुख, प्रा. दीपक बागले, विकास गुळवे, सी. एस. देवरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...