आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:सुकवदला नवे 3 पंप बसल्यावर मिळेल जानेवारीपासून एक दिवस लवकर पाणी

धुळे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या पन्नास टक्के भागाला तापी योजनेतून पाणीपुरवठा होतो. या योजनेंतर्गत असलेले सुकवद पपींग स्टेशनमधील पाणी उपसण्याचे पंप जुने झाल्याने तेथे तीन नवीन पंप बसवले जातील. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल. नवीन पंप बसवल्यानंतर वीज बिलाचे १ कोटी रूपये वर्षभरात वाचतील. तसेच पाणी वितरणातील सर्व तांत्रिक अडचणी दुर झाल्या तर जानेवारीपासून धुळेकरांना एक दिवस लवकर पाणी मिळेल.

तापी पाणीपुरवठा योजनेच्या सुकवद पपींग स्टेशन येथे सद्य:स्थितीत ४ पंप कार्यरत असून एक पंप राखीव आहे. या ठिकाणी आता तीन नवीन पंप बसवण्यात येतील. पंप बसवण्याचे काम नाशिक येथील बडगुजर अॅण्ड कंपनीला दिले आहे. या कंपनीने किर्लाेस्कर कंपनीला पंप बनवण्याचे काम दिले आहे. पंपाचे डिझाईन मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाने मंजूर केले. नवीन पंप ४५० अश्वशक्तीचे असतील. त्यांच्या पाईपाचा व्यास अधिक असल्याने पाणी उपसण्याची क्षमता जास्त असेल. त्यामुळे अधिक पाणी जलशुद्धीकरण केंद्रात येईल. तसेच आगामी काळात जलकुंभ लवकर भरणार असल्याने फायदा होईल.

एक तासात २० लाख लिटर उपसा
सुकवद पपींग स्टेशनमधील ४ पंपाद्वारे एका तासाला २० लाख लिटर पाणी उपसण्यात येते. हे काम आगामी काळात केवळ तीन पंपाने होईल. त्यामुळे वेळ व वीज बिलाची बचत होईल. सद्य:स्थितीत सुकवद पंपीग स्टेशनचे महिन्याला ६० लाख रुपये वीजबिल येते. नवीन पंप बसवल्यावर वीजबिल ४५ लाखांवर येईल. त्यामुळे वीज बिलात वर्षाला एका कोटीची बचत होईल.

काय होईल नवीन पंपाने फायदा
सुकवद पंपीग स्टेशनमध्ये सद्य:स्थितीत सद्य:स्थितीत एका पंपाद्वारे तासाला ४ लाख ५० हजार लिटर पाणी उपसले जाते. नवीन पंप एका तासाला ७ लाख लिटर उपसणारे असतील. आता ४ पंप मिळवून तासाला २० लाख लिटर पाणी उपसा करतात. नवीन तीन पंप २१ लाख लिटरपेक्षा जास्त पाणी उपसा करतील. त्यामुळे जलशुद्धीकरणाची प्रक्रिया वेगात होणार आहे.

एक वर्ष ठेकेदाराकडे जवाबदारी : नवीन पंप बसवल्यावर त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जवाबदारी एक वर्ष ठेकेदाराकडे असेल. नवीन पंप डिसेंबरअखेर सुकवद पपींग स्टेशनमध्ये बसवणे अपेक्षित आहे. त्यानंतर तांत्रिक अडचणी सोडवण्यात येतील व जानेवारीपासून एक दिवस लवकर पाणी मिळेल असे मनपाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...