आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमाशा:तमाशा कलावंतांकडे धुळे, नाशिक जिल्ह्यातून ‘सुपारी’; कोरोना निर्बंध उठवल्याचा परिणाम, बिदागीसाठी झाली प्रथमच गर्दी

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने शहरात मंगळवारी फड मालकांकडे तमाशाची सुपारी देण्यासाठी गर्दी झाली होती. धुळे व जळगाव जिल्ह्यातील १६ फडांचे मालक सुपारी घेण्यासाठी आले होते. बिदागी देण्यासाठी धुळ्यासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही हजेरी लावली होती. दोन वर्षांनंतर पहिल्यांदा तमाशा बाजारात चैतन्य होते.

शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल केले. त्यामुळे फड मालकांना दिलासा मिळाला. शहरातील जेलरोडवर मंगळवारी तमाशाची सुपारी घेण्यासाठी फड मालक आले होते. धुळे जिल्ह्यातील सहा, जळगाव जिल्ह्यातील दहा फड चालक होते. खान्देशात यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर एकाच वेळेस १६ फड मालक आल्याने कलावंतांना दिलासा मिळाला.

यात्रांच्या हंगामामुळे फायदा
एप्रिल आणि मे महिन्यात नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील गावांमध्ये यात्रा आहे. त्यामुळे नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून तमाशा फडांना मागणी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा तालुका वगळता उर्वरित भागात सोंगाड्या पार्टी लोकप्रिय असल्यामुळे या परिसरातून तमाशांना मागणी नगण्य आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, धरणगाव, पाचोरा, भडगाव, चोपडा या तालुक्यातून बिदागी मिळते आहे. १६ तमाशा फडांवर तीन हजारपेक्षा अधिक कलावंतांचा उदरनिर्वाह आहे.

बातम्या आणखी आहेत...