आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवीगाळ:वैद्यकीय अधिकाऱ्यांची अधीक्षकास मारहाण ; पोलिसांत गुन्हा दाखल

तळोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ड्यूटीवर मद्यमान करून आल्याचे वरिष्ठांना निदर्शनास आणून दिल्याचा राग आल्याने दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षकास मारहाण केल्याची घटना तळोदा येथील रुग्णालयात गुरुवारी घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अधीक्षक प्रफुल गायकवाड हे रुग्णालयाकडे ९ वाजे दरम्यान गेले असता गरोदर माता प्रसूतीसाठी दाखल असताना याठिकाणी कक्षसेवक अथवा जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्या अनुषंगाने कक्षसेवक यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. काही कालावधीनंतर गायकवाड हे त्यांच्या कार्यालयात बसले असता डॉ. कैलास ठाकरे व डॉ. गणेश पवार यांना आम्हाला का त्रास देतो, असे म्हणत हुज्जत घातली, दोघेही दारूच्या नशेत होते. सदर प्रकार गायकवाड यांनी तात्काळ भ्रमणध्वनीवरून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निदर्शनास आणून दिला.

याचा राग आल्याने शिवीगाळ करत धक्का बुकी करून मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत प्रफुल व्यंकटराव गायकवाड यांनी तळोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दाखल केली आहे. तपास कॉ. सुधीर गायकवाड हे करीत आहेत. याशिवाय संबधित दोघे वैद्यकीय अधिकारी हे स्थानिक असल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे, असा आरोप गायकवाडांनी केला.

बातम्या आणखी आहेत...