आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधारात:थकीत वीजबिलांमुळे पुरवठा खंडित; बोरदसह परिसरातील गावे अंधारात

बोरदएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

थकीत वीजबिलांमुळे तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. यातून ग्रामस्थ हैराण झाले पथदिव्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संतप्त ग्रामस्थांनी त्वरित विद्युत पुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

विद्युत वितरण कंपनीने तालुक्यातील सर्व गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. वास्तविक पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ग्रामसेवकांनी याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रत्येक ग्रामपंचायतीने मार्च महिन्यात ९७ हजार रुपये पथदिव्यांचे वीज बिल भरले आहे. अद्याप तीन महिन्यांचा कालावधी लोटला आता बिल पुन्हा कसे भरणार मार्च ते मार्च असे वीज बिलांचे समीकरण आहे. दरवर्षी १४ वा किंवा पंधरावा वित्त आयोगातून वीज बिल भरले जात असते. अद्याप ग्रामपंचायतीच्या खात्यात पंधरावा वित्त आयोगातील निधी जमा झाला नाही, अशी तक्रार ग्रामसेवकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्पदंशची भीती आहे.

ग्रामपंचायतींनी बिल भरणा केल्यास जोडणी करू
फेब्रुवारी महिन्यात सर्व ग्रामपंचायतींनी ९७ हजार रुपयांचा विद्युत बिलाचा भरणा केला आहे. त्यानंतर आता सर्व ग्रामपंचायतींकडे एप्रिल २०२२ पर्यंतचा बिल भरणा बाकी आहे. बिल भरणा झाल्यास त्वरित विद्युत जोडणी देण्यात येईल. त्याचबरोबर प्रत्येक पथदिव्याला स्वतंत्र स्विच बसविणे गरजेचे आहे. जेणे करून विजेची बचत होईल.
तिरुपती पाटील, मुख्य अभियंता विद्युत वितरण कंपनी तळोदा