आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणबाळ:६६ हजार ज्येष्ठांना ‘श्रावणबाळ’चा आधार ; दिलासा : शासनाच्या विविध याेजनांचा दीड लाख नागरिकांना मिळताेय लाभ, आर्थिक स्थैर्यासाठी प्रयत्न

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनातर्फे निराधार, विधवा, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांगासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांद्वारे सबंधितांना दरमहा अनुदान मिळते. त्यानूसार ६० ते ६५ वर्ष वयोगटातील निराधार ज्येष्ठांसाठी श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना राबवली जाते. या योजनेतंर्गत दरमाह एक हजार रूपये दिले जाते. जिल्ह्यातील ६६ हजार ३६७ ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेता आहे. वृध्दापकाळात काम होत नाही. तसेच नोकरी, व्यवसाय करणे कठीण असते. काही वेळा कुटुंबातील सदस्य ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करत नाही. दुसरीकडे ज्येष्ठांना औषधोपचार व इतर कारणासाठी पैशांची गरज भासत असते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनातर्फे ज्येष्ठांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना राबवली जाते. जिल्ह्यात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. जिल्ह्यात मार्चअखेर ६६ हजार ३६७ नागरीक या योजनेचे लाभार्थी आहे. श्रावण बाळ योजनेचे मुख्य उद्दीष्ट ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य्य करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणे हे आहे. या योजनेतंर्गत दरमहा एक हजार रूपये अनुदान ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यात जमा होते.

बातम्या आणखी आहेत...