आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवैध सावकारी प्रकरणातील संशयित राजेंद्र बंब अजूनही गुन्ह्यात सहकार्य करत नाही. त्याच्याकडे आढळून आलेल्या अनेक मुदत ठेवी (एफडी), विदेशी चलन, भिशीचे दस्तळऐवज अन् पसार असलेला त्याचा भाऊ संजय बंब याची चौकशी करायची आहे. त्यामुळे राजेंद्र बंबच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी शनिवारी धुळे न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
खासगी सावकारीमुळे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष वेधून घेणाऱ्या राजेंद्र जीवनलाल बंब ( वय ४९) याच्यावर आता पर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहे. त्यापैकी पहिल्या मूळ तक्रारीत राजेंद्र बंब पोलिस कोठडीत आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपली. त्यामुळे दुपारी बंब याला धुळे न्यायालयात उभे करण्यात आले. न्या. एम. जी. चव्हाण यांच्या न्यायासनासमोर कामकाज सुरू झाले. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. पराग मधुकर पाटील यांनी तर बंब यांच्या बाजूने अॅड. मोहन भंडारी यांनी बाजू मांडली. गुन्ह्याच्या तपासात संशयित राजेंद्र बंब अजूनही सहकार्य करत नाही. त्याच्याकडे एेवढा एेवज कुठून आला अथवा कोणी दिला, हे स्पष्ट झालेले नाही.
संशयित संजय बंब याच्या घरी व राजेंद्र बंबच्या लॉकरमध्ये अनेक एफडी मिळून आल्या आहे. त्यावर नावे असली तरी पत्ते नाही. त्यामुळे चौकशी सुरू आहे.याशिवाय भिशीचे दस्तएेवज ही मिळाले आहे. त्याबाबत चौकशी अजून झालेली नाही. तर जप्त परकीय चलन राजेंद्र बंब याने काेठून आणले आहे, याचा शोध घेणे राहिले आहे. याच प्रकरणातील त्याचा भाऊ तथा संशयित संजय बंब हा अटक टाळण्यासाठी पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. त्याबद्दल राजेंद्र बंब याच्याकडे चौकशी अद्याप राहिली आहे. एवढ्या ठोस कारणांमुळे राजेंंद्र बंब याची पोलिस कोठडीत वाढ करावी. अशी मागणी पोलिसांच्या वतीने सरकारी वकील पराग पाटील यांनी केली.
न्यायालयात दिले दस्तऐवज
संशयित राजेंद्र बंब चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे अनेक बाबीचा तपास राहिला आहे. त्यामुळे पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्या संदर्भातील काही दस्तऐवजही न्यायालयात सादर केले आहे.अॅड. पराग मधुकर पाटील, सरकारी वकील
अटकपूर्व जामीन दाखल
बंब अटकेत आहे. इतर तीन गुन्ह्यातील दस्तऐवजही मिळाली आहे. त्यामुळे त्यांना इतर तीन गुन्ह्यात अटक करू नये. यासाठी त्यांच्या वतीने अॅड.मोहन भंडारींनी अटक पूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.यावर १३ जून रोजी कामकाज होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.