आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णयास स्थगिती:राजवाडे बँकेच्या सहकारमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती

धुळे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे येथील राजवाडे मंडळ पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक अवसायनात निघाल्याने बँकेची मुख्य शाखा आणि कार्यालयीन इमारत रिकामी करून मिळावी यासाठी राज्याच्या सहकारमंत्र्यांकडे दाद मागण्यात आली होती. सहकारमंत्र्यांनी इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे संशोधन मंडळ, धुळे यांना जागेचा ताबा देण्यात यावा, असे आदेश दिले होते.

बँकेने जागा सदर संस्थेला देण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्यात आली. खंडपीठाचे न्या. एम. जी. शेवलीकर यांनी सहकारमंत्र्यांच्या निर्णयास स्थगिती दिली आहे.

संबंधित जागा बँकेने संस्थेकडून १९७८ मध्ये ९९ वर्षांच्या लिजवर घेतली होती. भाडेकराराचा अवधी पूर्ण झालेला नसल्याने तसेच संस्थेला केवळ बँकेचे लाभांश व नफ्यात वाटा मिळण्याचा अधिकार असून कुठलेही भाडे देय नसल्याने उपलब्ध कागदपत्रांवरून दर्शवण्यात आले. सद्यःस्थितीत बँकेची इमारत ही बँकेने स्वनिधीतून बांधलेली असून तिची शासकीय मूल्यांकनानुसार भरपाई बँकेला मिळणे आवश्यक आहे. त्यातून अवसायनातील बँकेला कायदेशीर देणी भागवणे शक्य होईल, असेही बँकेच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. बँकेतर्फे अॅड. विजय लटंगे यांनी बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...