आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:जुन्या वादातून आमोदा येथे तलवारीने हल्ला; सात जणांवर गुन्हा दाखल

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील आमोदा येथे मागील भांडणाच्या कारणावरून तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल पवार या तरुणाशी मागील भांडणाच्या कारणावरून वाद घालण्यात आला. त्यानंतर भाईदास आकाश भील, लखन मख्खन भील, गुलाब नाना भील, सुरेश अर्जुन भील, मोहन मख्खन भील, मख्खन भील, विलास नाना भील यांनी त्याला मारहाण केली. तसेच तलवारीने वार केला. जखमी अनिल पवार याची बहीण दीपाली पंडित पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...