आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:बोगस आदिवासींवर कारवाई‎ करत त्यांची सेवा समाप्त करा‎

शिंदखेडा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय सेवेत असलेल्या बोगस‎ आदिवासींवर कारवाई करून त्यांची सेवा‎ समाप्त करावी, या मागणीसाठी येथील‎ तहसील कार्यालयासमोर आदिवासी‎ एकता परिषद व आदिवासी टायगर‎ सेनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.‎ आंदोलनात आदिवासी एकता परिषदेचे‎ तालुका सचिव गुलाब सोनवणे,‎ आदिवासी टायगर सेनेचे अध्यक्ष भुपेंद्र‎ देवरे, किशोर ठाकरे, अप्पा सोनवणे, नाना‎ कुवर, सुरेश सोनवणे, शानाभाऊ‎ सोनवणे, दीपक फुले, एकनाथ भील,‎ शंकर मोरे, रामनाथ मालचे, दीपक मोरे,‎ मोतीलाल सोनवणे, भुरा सोनवणे, युवराज‎ पवार, रवी चव्हाण, एकनाथ धनगरे,‎ प्रकाश पाडवी, सुनील मोरे सुरेश मालचे,‎ गोपाल फुले आदी उपस्थित होते.‎ शासनाच्या सेवेत असलेल्या बोगस‎ आदिवासींवर तत्काळ कारवाई करून‎ त्यांची सेवा समाप्त करावी.

तसेच पात्र‎ आदिवासींना शासनाच्या सेवेत घ्यावे,‎ राज्यात १२ हजार ५०० बोगस आदिवासींनी‎ नोकऱ्या बळकावल्या आहे. शासनाने‎ त्यांना बडतर्फ न करता १४ डिसेंबर २०२२‎ रोजी संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.‎ हा निर्णय चुकीचा असून त्याकडे लक्ष‎ वेधण्यासाठी आंदोलन झाले. या वेळी‎ चुकीच्या धोरणाविरोधात घोषणा दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...