आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:माजी सैनिकास चुकीची वागणूक  देणाऱ्या पोलिसावर कारवाई करा

शिंदखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात माजी सैनिक पंकज पाटील यांना किरकोळ कारणातून चोपडा शहराचे पीआय अवतारसिंग चव्हाण यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिंदखेडा तालुक्यातील आजी-माजी सैनिकांनी तहसीलदार सुनील सैंदाणे यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, पोलिस अधिकाऱ्याने माजी सैनिकाला मारहाण करणे अयोग्य आहे. पोलिस अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा अधिकार कुणीही दिलेला नाही. त्यामुळे पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आजी-माजी सैनिक संघटनेचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे, कार्याध्यक्ष नंदराज साळुंखे, शहराध्यक्ष भावसिंग गिरासे, कार्यापाध्यक्ष भूषण पवार, सहसचिव संजय नगराळे, नथू सूर्यवंशी, ईश्वर सोनवणे, सोमनाथ बडगुजर, शांताराम जाधव, दीपक परदेशी, महेश अहिरे, प्रमोद गुरव, देविदास कोळी, कैलास ठाकरे, हर्षल पाटील, हेमंत माळी आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...