आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्व:पशुधनाची जास्त काळजी घ्यावी;  शेतीबरोबर पशुधनाचे महत्त्व

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या जीवनात शेतीबरोबर पशुधनाचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधनाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचना आमदार कुणाल पाटील यांनी केली.

धुळे तालुक्यातील विंचूर येथे पशुवैद्यकीय शिबिर झाले. त्या वेळी ते बोलत होते. गायीची पूजा करून आमदार पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. आमदार कुणाल पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनामुळे आमूलाग्र बदल होताे आहे. शेतीसह पशुधनाचा मोठा आधार शेतकऱ्यांना असतो. त्यामुळे पशुधनाच्या आरोग्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी.

पावसाळ्यात जनावरांमध्ये लाळखुरकत, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंर्त्रविषार, गोटपॉक्स, डायरिया आदी आजार आढळतात. या आजारांवर शिबिरात उपचार केले जात आहे. कार्यक्रमाला बोरकुंडचे माजी सरपंच बाळासाहेब भदाणे, साहेबराव खैरनार, पंचायत समितीचे सदस्य विजय देसले, बाबाजी माळी, अ‍ॅड.बी.डी. पाटील, जनार्दन देसले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र लंघे, डॉ. प्रशांत निकम, बापू खैरनार, अशोक बोरसे, शशिकांत देसले आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...