आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटा चोरी:अंधाराचा फायदा घेत कुलूप तोडून घरात प्रवेश; 500 रुपयांच्या 200 नोटा चोरून नेल्या

सारंगखेडा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील कळंबू येथे भास्कर दगा बोरसे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली. त्यामुळे गाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

रात्री गावामधील सर्व दुकाने बंद झाल्यानंतर परिसरात कुणीही नसते. ग्रामीण भागातील सर्व नागरिक मोलमजुरी करून थकल्याने लवकर झोपतात. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी अंधारात जुन्या घराचे लॉक तोडले. घरातील सर्व कपडे अस्ताव्यस्त फेकून एक लाखाची रोकड घेत पोबारा केला. सकाळी जुन्या घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार बोरसेंच्या लक्षात आला. सारंगखेडा पोलिस ठाण्याशी संपर्क करून त्यांनी घटनेची माहिती दिली. सारंगखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ तत्काळ घटनास्थळी पोहोचले.

भास्कर बोरसे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गावातील जुन्या घरामध्ये १ लाखाची रुपयाची रोख रक्कम ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी जुन्या घराचे कुलूप तोडून ५०० च्या २०० चलनी नोटा लंपास केल्याचे नमूद केले आहे. एक लाखाचा डल्ला मारून चोरटे फरार झाले. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाट, बॅग, जुन्या पेट्या किमती ऐवज शोधण्यासाठी उघडून ठेवल्या होत्या. पलंगावरची गादी अस्ताव्यस्त असल्याची माहितीही फिर्यादीत नमूद केली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिरसाठ करत आहे.

बातम्या आणखी आहेत...