आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन अटक:तळोदा भाजप आदिवासी  माेर्चाचे प्रशासनास निवेदनस

तळोदा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल अभद्र व अशोभनीय वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांचे पद काढून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन अटक करावी, या मागणीसाठी तळोदा तालुका भाजप आदिवासी मोर्चातर्फे तहसीलदार गिरीश वखारे व पोलिस निरीक्षकांना निवेदन दिलेे. तीव्र आंदाेलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी शहादा-तळोदा विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, पं.स. सभापती यशवंत ठाकरे, जि.प. सदस्य जितेंद्र पाडवी, भरत पवार, शहराध्यक्ष योगेश चौधरी, सतीश वळवी, प्रवीणसिंह राजपूत, माजी तालुकाध्यक्ष यशवंत पाडवी, भाजप आदिवासी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दरबारसिंग पाडवी, तालुकाध्यक्ष दारासिंग वसावे, पं.स. सदस्य विक्रम पाडवी, अनिल पवार, दाज्या पावरा, विजयसिंह राणा, सरचिटणीस कांतिलाल पाडवी, शामा महाराज, चेतन गोसावी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...