आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतदया:लळिंग कुरणातील पाणवठ्यांमध्ये पशुपक्ष्यांसाठी टँकरने पाण्याची सोय, भटकंती टळण्यास मदत; उन्हाळ्यामुळे प्राण्यांची होत होती गैरसोय

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्ग मित्र समितीतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत लळिंग कुरणातील पाणवठ्यांमध्ये पशुपक्षी व वन्यप्राण्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

शहरापासून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर १२ किमी अंतरावर लळिंग कुरण व लांडोर बंगला परिसर आहे. या भागात बिबटे, हरीण, मोर यासह अनेक वन्यप्राणी आहेत. उन्हाळ्यात त्यांना पाणी मिळावे यासाठी निसर्ग मित्र समितीतर्फे टँकरने जंगलातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश रणदिवे, डॉ. रवींद्र सोनवणे, नागसेन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा देवरे, हर्षल महाजन, प्रा. जयवंतराव भामरे, रुख्माताई पाटील आदींचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमाला नुकताच प्रारंभ झाला. या वेळी निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, डॉ. जितेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत झाडांचे महत्त्व व फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी वाढते तापमान कमी करण्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण करावे, असे आवाहन केले. समितीचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. राज्य संघटक प्रभाकर सूर्यवंशी यांनी आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर.आर. सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख हर्षल महाजन, निसर्ग अहिरे यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...