आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:थकबाकीदारांचे नळ बंद; पिठाच्या गिरणीला सील

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागातर्फे थकबाकीदारांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यानुसार स्टेशन रोडवरील स्नेहनगरात एका थकबाकीदाराचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले. तसेच विविध चार ठिकाणी जप्तीची कारवाई केली.शहरातील अनेकांनी मालमत्ताकर थकवला आहे. संबंधितांना नोटीस दिल्यावरही ते कराचा भरणा करत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे.

नळ जोडणी खंडित करणे, मालमत्ता जप्त केली जाते आहे. त्यानुसार स्नेह नगरातील एका मालमत्ताधारकांकडे ८५ हजार ५०७ रुपये मालमत्ता कर व १३ हजार रुपये पाणीपट्टी थकीत होती. त्यामुळे सोमवारी या ठिकाणी पथकाने कारवाई करून तात्पुरत्या स्वरूपात नळ जोडणी खंडित केली.

तसेच शहरातील विविध भागात चार ठिकाणी जप्तीची कारवाई केली. त्यात मोहाडी येथे एक पीठाची गिरणी जप्त करण्यात आली आहे. संबंधिताकडे १ लाख १२ हजार रुपये थकबाकी होती. जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव, मुंकुद अग्रवाल, मधुकर वडनेरे, सुनील गढरी, प्रदीप पाटील, झेड. पी. कोळी भरत पारखे आदींनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...