आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना सुरू:तापीच्या जलवाहिनीला गळती पण पाणी मिळेल

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेच्या जलवाहिनीला सोमवारी पहाटे ५ वाजता नरडाणा येथील पिंप्राड शिवारात गळती लागली. जलवाहिनीला ४ फूट लांबीचा तडा गेल्याने पाणी शेतांमध्ये गेले. महापालिकेने पोलिस बंदाेबस्तात पाच तास गळती थांबवण्याचे काम करून सायंकाळनंतर पाणीपुरवठा सुरळीत केला.

शहराच्या पन्नास टक्के भागाला तापी योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. तापी योजनेच्या जलवाहिनीतून चोवीस तास पाणी वाहत असते. पण या जलवाहिनीला नेहमी गळती लागते. त्यामुळे दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करावा लागतो. जलवाहिनीला सोमवारी नरडाणा येथील हॉटेल शीतल समोर गळती लागली.

गळती मोठी असल्याने परिसरातील शेतांमध्ये पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी आंदोलन केले. गोधळ वाढल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शिंदखेडा तहसील कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. शेतकऱ्यांशी चर्चा झाल्यावर गळती थांबवण्याचे काम सुरू झाले. सलग पाच तास हे काम सुरू होते. त्यानंतर रात्री आठ वाजता जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे उद्या मंगळवारी देवपूर भागात पाणीपुरवठा होईल.

बातम्या आणखी आहेत...