आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा पूर्ववत:तापी योजना पाणीपुरवठा शनिवारी होणार पूर्ववत

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेच्या जलवाहिनीला दोन ठिकाणी गळती लागली आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारपासून सुरू झाले. या कामाची आयुक्त देवीदास टेकाळे यांनी पाहणी केली. तापी योजनेतून शनिवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती देण्यात आली. तापी पाणी योजनेवरुन शहरातील ७० टक्के भागाला पाणीपुरवठा होतो. या योजनेची जलवाहिनी जीर्ण झाली आहे.

त्यामुळे तिला नेहमी गळती लागत असते. ज्या ठिकाणी जलवाहिनीची दुरुस्ती केलेली असते त्याच ठिकाणी गळती लागण्याचे प्रकार घडतात. जलवाहिनीला गळती लागल्यावर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. तापीच्या जलवाहिनीला सोनगीर गावाजवळ चुना फॅक्टरी तसेच जामफळ तलाव क्षेत्राजवळ गळती लागली आहे. त्यामुळे गळती दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तापी योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. गळती दुरुस्तीचे काम शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत होईल. त्यानंतर शहरात शनिवारपासून नियमित पाणीपुरवठा होईल. जलवाहिनीच्या कामाची आयुक्त देवीदास टेकाळे, अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत उगले आदींनी पाहणी केली. काम वेगात सुरू करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...