आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाखल:नागरिकांना कराची दिली नोटीस; नागरिक करताय हरकती दाखल

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्तांचे पहिल्यांदा मोजमाप करण्यात आले. मोजमाप केल्यानंतर मालमत्ताधारकांना मनपाने आकारणीच्या नोटीस दिल्या आहे. हद्दवाढीनंतर प्रथमच महापालिका दराने नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीच्या कराच्या मानाने ही रक्कम जवळपास पाच पट होत आहे. यात पूर्वी ज्यांचा मालमत्ता कर ४४७ होता. तो नवीन देण्यात आलेल्या करात १३ हजार २३६ रुपये इतका आहे. त्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. हा कराचा भार असह्य झाल्याने मनपात हरकतींचा पाऊस पडत आहे.

महापालिकेने मालमत्ता मोजमाप करण्याचे कंत्राट दिले आहे. शहरात नवीन व वाढीव बांधकाम झालेल्या मालमत्तांचे प्रमाण आहे. त्यात २०१८ मध्ये महापालिकेची हद्दवाढ होऊन दहा गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्या हद्दवाढ क्षेत्रात मोठया प्रमाणात नवीन वसाहती निर्माण झाल्या आहे. त्याचप्रमाणे काही मालमत्तांचे वाढीव बांधकाम करण्यात आले आहे. त्या मालमत्तांची यानिमित्ताने प्रथमच मोजणी करण्यात येत आहे. मोजणी केल्यानंतर महापालिका कर विभागातर्फे शंभर टक्के आकारणीचे कर नोटीस देण्यात आली आहे.

८० टक्के रकमेची कर नोटीस
महापालिकेची ५ जानेवारी २०१८ मध्ये हद्दवाढ होऊन दहा गावांचा समावेश झाला आहे. मात्र समावेश झाल्यानंतर मनपा प्रशासनाने तेथे मालमत्ता कर आकारणी शहराप्रमाणे केली नाही. तर शहराच्या दराप्रमाणे दरवर्षी २० टक्के याप्रमाणे ती करण्यात येणार होती. मात्र चार वर्षापर्यंत मनपा या क्षेत्रातून पूर्वीच्याच ;ग्रामपंचायत दराप्रमाणेच मालमत्ता कराची वसुली करीत होती. तर आता मालमत्तांचे मोजमाप होऊन चार वर्षानंतर २० टक्केप्रमाणे ८० टक्के कराच्या नोटीस दिली आहे. २०२२-२३ मध्ये ८० टक्के प्रमाणे बिल आकारणी होणार आहे.

कराची नोटीस पाहून अनेकांना फुटला घाम
महापालिका हद्दीत समावेशापूर्वी येथे ग्रामपंचायत असल्याने त्याचे मालमत्ता कर महापालिकेच्या तुलनेने कमी होते. तर मनपात गेल्यानंतरही महापालिकेने अजून त्या दराने आकारनी सुरू केली नव्हती. महापालिकेकडे मालमत्तांची पूर्ण माहिती व मोजमाप नसल्याने कर आकारणी करता येत नसल्याने महापालिकेने सुरुवातीला मालमत्तांचे मोजमाप करण्यास सुरुवात करुन ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना एकूण कराची नोंटीस दिली आहे. मात्र ही कराची नोटीस पाहुन अनेकांना घाम फुटल्याने हद्दवाढीतून नागरीक मोठया प्रमाणात यावर हरकत घेत आहे.

हरकतींवर होणार सुनावणी : ज्यात पूर्वी ग्रामपंचायत क्षेत्रात ज्यांना दोन हजार घरपट्टी होती. ती आता महापालिका क्षेत्रात आल्यावर १० हजार रुपये आली आहे. त्यामुळे ही तफावत जवळपास ५ पट दिसत आहे. रक्कम मोठी दिसत असल्याने नागरिकांनी यावर हरकत घेत त्या मनपात नोंदवणे सुरु केले आहे. तर मनपाही त्या नोंदवून घेऊन त्याची सुनावणी होणार आहे. सुनावणीत त्याची पुन्हा तपासणी करुन ती निकाली काढण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...