आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटिसांचे वाटप:वलवाडी भागात देणार आजपासून कराची नोटीस

धुळे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतर्फे शहरातील मालमत्तांचे मोजमाप करण्यात येऊन त्यांचे कर मूल्यनिर्धारण करून त्यांना त्याप्रमाणे मालमत्ता कराची आकारणी करून पावती देण्यात येत आहे. हद्दवाढीतील दहा गावांमधील केवळ वलवाडी भागात कराची नोटीस देणे बाकी होते. उर्वरित गावांचे काम झाले आहे. आता वलवाडी भागात शुक्रवारपासून कराची नोटीस देण्याचे काम सुरू होणार आहे. तर नागरिक त्यावर महापालिकेत लेखी हरकत घेऊ शकतात. महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व मालमत्तांचे मोजमाप करण्यासाठी खासगी कंत्राट दिले आहे. त्यानुसार हद्दवाढीच्या क्षेत्रासह मालमत्तांचे मोजमाप करण्यात आले आहे. त्यात हद्दवाढ क्षेत्रातील ९ गावांचे मोजमाप पूर्ण करून तेथील नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटिसांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर त्या क्षेत्रातील नागरिकांनी हरकती देखील घेतल्या आहेत.

हरकत घेता येणार
वलवाडी भागाचे चार भाग करण्यात आले आहे. त्याप्रमाणे शुक्रवारपासून कराचे नोटीस वाटप होणार आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून २१ दिवसांच्या आत नागरिकांना हरकत घेता येईल.

बातम्या आणखी आहेत...