आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा:शिक्षक पात्रता परीक्षा उत्तरसूची प्रसिद्ध; निकालाची प्रतीक्षा

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षा २१ नोव्हेंबरला झाली होती. पण पेपर फुटल्याने निकाल लांबणीवर पडला. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे परीक्षेचा निकाल कधी लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

गुणवंत शिक्षक मिळावे या उद्देशाने शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते. दोन वर्षांच्या खंडानंतर २१ नोव्हेंबरला ही परीक्षा घेण्यात आली होती. पण पेपर फुटीमुळे परीक्षा वादात सापडली. चौकशीचे सत्र सुरू झाले. अनेक दिवसांपासून चौकशीचे सत्र सुरू होते. याच कालावधीत ८ डिसेंबरला टीईटीचा पेपर १ आणि २ च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत आणि पर्यायी उत्तर, त्रुटींबाबत हरकती मागवण्यात आल्या. त्यानंतर आता राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली. उत्तर सूचीवर सहा महिन्यांपर्यंत हरकती दाखल करण्याची संधी होती. त्यामुळे आता प्राप्त होणाऱ्या हरकती विचारात घेण्यात येणार नाही. तसेच लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.