आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन:शिक्षकांना आता दरमहा एक तारखेलाच वेतन

धुळे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन आता थेट मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात दरमहा १ तारखेला विनाअडथळा जमा होते आहे. सेवा हमी कायद्यामुळे हे शक्य झाले आहे.

खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. अनेक वर्षांपासून हा प्रश्न आहे. याविषयाकडे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी वारंवार लक्ष वेधले. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी एप्रिल महिन्यात सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी व वेतन पथक कार्यालयाने वेतन वेळेवर देण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या खातेनिहाय माहितीतील त्रुटी दूर केल्या. तसेच बँकांची मदत घेतली. त्यामुळे मे, जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात शिक्षकांना एक तारखेलाच वेतन मिळाले. वरिष्ठ शिक्षण अधिकारी, वेतन पथक कर्मचारी, विविध संघटनांच्या सकारात्मकतेमुळे वेतन वेळेत देणे शक्य होत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मोहन देसले व वेतन पक्षक अधीक्षक मीनाक्षी गिरी यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात ५३५ शाळेत ८ हजार ८८२ कर्मचारी आहे.

शिक्षक संवाद उपक्रमाने समन्वय राखण्यास मदत
सेवा हमी कायद्यातंर्गत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निवारण केले जाते आहे. त्यासाठी दरमहा दुसऱ्या सोमवारी दुपारी ३ वाजता शिक्षक संवाद उपक्रम राबवला जातो आहे. या उपक्रमातंर्गत शिक्षकांच्या समस्या जागेवरच सोडवल्या जात आहे.

बातम्या आणखी आहेत...