आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील सी. बी. देसले विद्यालयात शिक्षण परिषद झाली. या वेळी जलसाक्षरता, अध्ययन, पर्यावरणावर चर्चा करण्यात आली. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा शिंदे, केंद्रप्रमुख जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषद झाली.
शिक्षण परिषदेचे अध्यक्ष दिनेश पाटील होते. परिषदेत जलसाक्षरता विषयावर मनोहर पाटील यांनी माहिती दिली. त्यांनी जलसक्षारतेचे महत्त्व, पाण्याचे स्रोत, परिणाम व उपयोगावर मत व्यक्त केले. अध्यापकांनी गटचर्चा करून जलसाक्षरतेविषयी सर्वांनी जनजागृती करावी, असे आवाहन केले. शिक्षण परिषदेत चिरणे केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेश चौधरी, गिरीश बागूल, संदीप देसले, मनोज पाटील, प्रेमजित दाभाडे, योगेश धात्रक, गणेश नागरगोजे, सुधीर मोरे आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन सारंग पाटील यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.