आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएएस:शिक्षकांनी घालवली मनातून स्पर्धेची भीती म्हणूनच आज आयएएस

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये चमकदार कामगिरी करण्याची क्षमता असते. या क्षमतेला शिक्षकांनी चालना दिली तर आयुष्य बदलून जाते. तसेच काही माझ्या आयुष्यात घडले. शिक्षकांनी माझ्या मनातून स्पर्धेची भीती घालवून सुप्त गुणांना वाव दिला. त्यामुळे पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवता आले. आयएएस अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत येता आले. गावाला गेल्यावर आवर्जून शाळेला भेट देण्यासह शिक्षकांशी संवाद साधते.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षक महत्त्वाचे असतात. दहावीत असताना शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती. दहा मिनिटांत एका विषयावर बोलायचे होते. मला वाटले मी हे करू शकणार नाही. त्यानंतरही शिक्षिका मिस फिरा, मिस मोनिका आणि सुभद्रा मॅडम यांनी या स्पर्धेसाठी माझे नाव दिले. पण मनात भीती होती. स्पर्धेसाठी शिक्षिकांनी माझी तयारी करून घेतली. तसेच आत्मविश्वास दिला. त्यामुळे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला. ती घटना आत्मविश्वास वाढवण्यासह आयुष्याचा टर्निंग पाॅइंट ठरली. शिक्षकांनी माझ्या गुणांची पारख करत प्रोत्साहन दिले. इतर विद्यार्थिनींनाही त्यांच्या गुणवत्तेनुसार त्या-त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मदत केली. त्यामुळे मनातील न्यूनगंड दूर होण्यास मदत झाली. शाळेत असताना शिक्षिकांनी स्पर्धा परीक्षेची ओळख करून दिली. मनातील भीती घालवली. त्यामुळे पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आयएएस होता आले. (शब्दांकन : अमोल पाटील)

उच्च पदावर पोहाेचल्यावरही शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पाठबळ प्रेरणादायी ठरले. जेव्हा चुकली तेव्हा त्यांनी मला शिक्षाही केली. त्यांनी केलेल्या शिक्षेमुळेच जीवनाला शिस्त लागली. आजही गावाला गेल्यावर चेन्नईतील ख्रिस्ट किंग कन्या माध्यमिक विद्यालयाला भेट देते. शिक्षकांना भेटते. शिक्षकांना भेटल्यावर आजही विद्यार्थी असल्याचे जाणवते.

हात आखडता घेऊन ज्ञान देऊ नका
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांची पारख करून त्यांना त्या-त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. जे विद्यार्थी हुशार आहे. ते शिकतीलच पण जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहे त्यांना शिक्षकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हात आखडून ज्ञान देऊ नये.

बातम्या आणखी आहेत...