आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्रिया‎:कॅशलेस आरोग्य विम्याची‎ शिक्षकांना प्रतिक्षा कायम‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनुदानित शाळेतील शिक्षकांना‎ शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे कॅशलेस‎ आरोग्य विमा योजना लागू‎ करण्याची घोषणा शिक्षण विभागाने‎ केली होती. त्यासाठी शिक्षण‎ आयुक्तांनी सर्व शिक्षकांना शिक्षण‎ विभागाच्या अॅप्लिकेशनावर माहिती‎ सादर करण्याची सूचना केली. पण‎ अद्याप या योजनेची अंमलबजावणी‎ सुरू झालेली नाही.‎ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी‎ आणि त्यांच्यावर अवलंबून‎ असलेल्या नातलगांवर झालेला‎ आैषधोपचाराचा खर्च शासनकडून‎ मिळतो. पण वैद्यकीय बिल‎ मिळवण्यासाठी शिक्षकांना अनेक‎ अडचणी येतात.

त्यासाठी‎ शिक्षकांना वारंवार जिल्हा‎ शल्यचिकित्संकाकडे जावे लागते.‎ तसेच बिलाची रक्कम जास्त असेल‎ तर शिक्षण उपसंचालक कार्यालय‎ किंवा मंत्रालयात जावे लागते.‎ पोलिस कर्मचारी तसेच‎ अधिकाऱ्यांना कॅशलेस आरोग्य‎ विमा योजना लागू झाली आहे.‎ त्याच धर्तीवर शिक्षक व शिक्षकेतर‎ कर्मचाऱ्यांना कॅशलेस योजना सुरु‎ करावी, अशी मागणी शिक्षक‎ संघटनांची होती. त्यानुसार कॅशलेस‎ विमा योजना लागू करण्याचा निर्णय‎ शिक्षण विभागाने घेतला. त्यासाठी‎ काही महिन्यापूर्वी प्राथमिक प्रक्रिया‎ राबवण्यात आली. योजना‎ राबवण्यासाठी शिक्षक व त्यांच्या‎ कुटुंबियांची माहिती घेण्यात आली.‎ पण योजनेची अंमलबजावणी नाही.

बातम्या आणखी आहेत...