आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीड महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर उद्या बुधवारपासून शाळा सुरू होतील. नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागताचे शाळांमध्ये नियोजन झाले आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक पडतील. तसेच गोड पदार्थांचे वाटप होईल. दोन दिवसांपासून शाळांमध्ये स्वच्छतेवर भर दिला. क्षेत्रीय अधिकारी शाळांना भेट देतील. शिक्षकांचे लसीकरण झाले आहे.
दोन दिवसांपासून शाळांमध्ये तयारी सुरू आहे. त्यानंतर आता उद्या बुधवारपासून प्रत्यक्ष शाळा होईल. क्षेत्रीय अधिकारी शाळेला भेट देतील. पाचवी ते दहावीला शिकवणारे ५ हजार ५८७ शिक्षक व ६३२ शिक्षकेतर कर्मचारी आहे. त्यात मुख्याध्यापक ३८५, उपमुख्याध्यापक २५, पर्यवेक्षक ११२ आहे. नववी व दहावीचे १ हजार ६९३ शिक्षक, सहावी ते आठवीचे २ हजार ३१२, पाचवीचे १ हजार ६० शिक्षक आहे. मुख्य लिपिक १०, वरिष्ठ लिपिक ४०३, ग्रंथपाल २२, प्रयोगशाळा सहायक ८८ आहे. सर्वांचे लसीकरण झाले आहे. प्राथमिक १ हजार ४१२ शाळा आहे. या शाळेत ६ हजार १८३ शिक्षक आहे. त्यांचेही लसीकरण झाले आहे.
आजपासून विद्यार्थ्यांचे लसीकरण
जिल्ह्यात सहावी ते आठवीचे ७३ हजार ३३० विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी ३२ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी पहिला तर १३ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. नववी ते बारावीच्या १ लाख १३ हजार ४४७ पैकी ६८ हजार ९०० विद्यार्थ्यांनी पहिला तर ५० हजार विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. आता शाळानिहाय लसीकरण बुधवारपासून होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.