आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:निवड श्रेणीच्या यादीतून‎ शिक्षकांना डावलले‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद प्रशासनाने निवड‎ श्रेणी मंजुरीची यादी जाहीर केली‎ आहे. त्यानुसार २५९ शिक्षकांना‎ निवड श्रेणीचा लाभ मिळाला आहे.‎ दुसरीकडे काही पात्र शिक्षकांना‎ प्रस्ताव सादर करूनही निवड‎ श्रेणीचा लाभ मिळालेला नाही.‎ त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून‎ पात्र लाभार्थ्यांना निवड श्रेणीचा‎ लाभ द्यावा, अशी मागणी प्राथमिक‎ शिक्षक समन्वय समितीने केली‎ आहे.

याविषयी शिक्षणाधिकारी‎ राकेश साळुंखे यांना निवेदन दिले .‎ काही शिक्षकांना निवड श्रेणीचा‎ लाभ मिळाला नसल्याने प्राथमिक‎ शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता यादी‎ दुरुस्ती करून अद्ययावत यादी‎ प्रसिद्ध करण्यात यावी,‎ धूलिवंदनाची सुटी ८ ऐवजी ७‎ मार्चला करावी, अशी मागणी‎ निवेदनाद्वारे करण्यात आली. या‎ वेळी शिक्षक समन्वय समितीचे‎ सरचिटणीस भूपेश वाघ, कार्याध्यक्ष‎ विजय पाटील, साहेबराव गिरासे,‎ राजेंद्र भामरे, नवीनचंद्र भदाणे, रा.‎ का. पाटील, सुधीर पाटील,‎ ऋषीकेश कापडे, चंद्रकांत सत्तेसा‎ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...