आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाज:तापमान @ 9 अंश; ढगाळवातावरणाने गारवा कमी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात किमान तापमान ११ अंशांवर गेले होते. पण दोन दिवसांपासून पुन्हा ते घटले असून, ते ९ अंशांवर आले आहे. दुसरीकडे दिवसाचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आहे. दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत असल्याने गारठा कमी झाला आहे. ही स्थिती काही दिवस टिकून राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण सौम्य असेल.

शहरात नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढला आहे. मध्यंतरी किमान तापमान ८ अंशांवर आले होते. त्यानंतर ते पुन्हा वाढले. आठवडाभरापासून किमान तापमान १० अंश तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस हाेते. पण दोन दिवसांपासून रात्रीचे किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअसवर आले आहे. एक आठवड्यानंतर किमान तापमान १० अंशांच्या खाली आले.

तसेच काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा प्रभाव कमी झाले आहे. याविषयी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या वादळामुळे वाऱ्याच्या प्रभाव बदलला आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण व थंडी सौम्य असेल असेही साबळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...