आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात बदल होण्यास सुरुवात:तापमान @ 9 अंश  रात्री गारठा वाढला

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धुळेकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे. दोन दिवसांपासून रात्रीचे तापमान कमी होत असल्याने रात्री नऊ वाजेनंतर गारठा जाणवतो. शहरात किमान ९.८ अंशांवर आले आहे. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान आहे.

शहरात दिवसाच्या तापमानात अद्याप फारसा बदल झालेला नाही. दिवसाचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसवर आहे. त्यामुळे दिवसा उन्हाची तीव्रता जाणवते. मात्र, सायंकाळनंतर वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळनंतर गारठ्यात हळूहळू वाढ होत असून तापमानाचा पारा घसरतो आहे. शहरात मंगळवारी किमान तापमान १० अंशांपर्यंत कमी झाले होते.

तापमान १ अंशाने घटले
शहराचे बुधवारी किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअसवर घसरले. रात्रीच्या तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांपासून घट होते आहे. दिवसाचे कमाल तापमान १ अंशाने कमी झाले आहे. बुधवारी कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस होते. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमान कमी होते आहे. थंडी वाढल्याने नागरिकांनी स्वेटरचा वापर करता आहे.

बातम्या आणखी आहेत...