आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुडहुडी:उत्तर, ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान 8 अंशांवर

धुळे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून रात्रीचे किमान तापमान १० अंशांच्या खाली आले होते. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर किमान तापमान ८.२ अंश सेल्सिअसवर आले. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान आहे. उत्तर व ईशान्येकडून वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यामुळे तापमान घसरले असून, येत्या काही दिवसांत थंडीचे प्रमाण वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

शहरात २ नोव्हेंबरला किमान तापमान ९ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर त्यात वाढ झाली. ते १३ ते १४ अंशांवर गेले. तसेच कमाल तापमानही ३२ ते ३३ अंश होते. त्यामुळे गारठा कमी झाला होता. आता पुन्हा दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. शहरात गुरुवारी मध्यरात्री किमान तापमान ९ अंश होते. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर तापमान पुन्हा १ अंशाने घटून ८.२ अंशांवर आले.

जास्त थंडी त्रासदायक
तापमान ८ अंशांपेक्षा कमी झाल्यास रब्बी हंगामातील गहू, हरभरा, जवस, मसूर या पिकांसह फळपिकांनाही ते त्रासदायक ठरू शकते. थंडी जास्त वाढल्यास फळपिकांच्या आजूबाजूला शेकाेटी पेटवण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

काही दिवसांत प्रमाण वाढेल
उत्तर व ईशान्यकडील वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने तापमानात घटले आहे. काही दिवस किमान तापमान १० अंशांच्या खाली असेल. िडसेंबरमध्ये किमान तापमान ५ अंशांपर्यंत कमी होऊ शकते.- रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...