आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची कारवाई:थकबाकीमुळे दहा दुकाने सील, नळ जोडण्या खंडित; वसुलीवर लक्ष केंद्रित

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या व्यापारी संकुलातील दहा दुकान सील केेले. तसेच दहा जणांची नळ जोडणी खंडित केल्याची माहिती महापालिका वसुली पथकाचे प्रमुख शिरीष जाधव यांनी दिली.महापालिका हद्दीतील अनेक मालमत्ताधारक वारंवार सूचना करूनही कर भरत नाही. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबवली जाते आहे.

गेल्या आठ दिवसांत वसुली पथकाने प्रबाेधनकार ठाकरे संकुल, गल्ली क्रमांक पाच, खाेलगल्ली आदी भागातील दहा दुकान सील केली. तसेच देवपूर, वलवाडी, नकाणे राेड, साक्रीराेड आदी भागातील दहा जणांचे नळ कनेक्शन खंडित केले आहे. आयुक्त देविदास टेकाळे, कर निर्धारण अधिकारी तथा उपायुक्त पल्लवी शिरसाठ यांच्या सूचनेनुसार वसुली विभागातील शिरीष जाधव, मधुकर निकुंभ, पंकज शर्मा, मुकुंद अग्रवाल, कैलास पाटील यांनी कारवाई केली.

एसआरपीएफकडून भरणा
एसआरपीएफकडे आठ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असल्याने त्यांनाही नाेटीस बजावण्यात आली हाेती. त्यानंतर धनादेश जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी थकीत मालमत्ता कर, पाणीपट्टी भरावी, असे आवाहन मनपाने केेले आहे.

बातम्या आणखी आहेत...