आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बोटींची चाचणी ;पावसाळ्याच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याची अधिकाऱ्यांची सूचना

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी सर्व विभागांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी दिलेल्या साधनांची चाचणी (मॉक ड्रील) करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार बुधवारी शहरापासून जवळच असलेल्या नकाणे तलावात आपत्ती व्यवस्थापनावर रंगीत तालीम झाली. या वेळी जिल्ह्याला मिळालेल्या दोन नवीन बोटींची चाचणी घेण्यात आली.

आपत्ती निवारणासाठी राज्य शासनाकडून जिल्ह्यात दोन बोटी मिळाल्या आहे. त्यापैकी एक बोट धुळे महापालिकेला तर दुसरी शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेला देण्यात आली आहे. या बोटींची बुधवारी जिल्हाधिकारी शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नकाणे तलावात चाचणी घेण्यात आली.

या वेळी महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त संगीता नांदुरकर, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे समादेशक प्रल्हाद खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत पारस्कर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनवणे उपस्थित होते. या वेळी आयुक्त टेकाळे यांनी महापालिकेतील प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. राज्य आपत्ती प्रतिसाद दलानेही नियमितपणे सराव करावा, असेही ते म्हणाले. पारस्कर यांनी सांगितले की, धुळे येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी कार्यान्वित आहे. या तुकडीतील जवान जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी मदतीसाठी जातात, असेही ते म्हणाले.

यांनी नोंदवला सहभाग
रंगीत तालमीत पोलिस उपनिरीक्षक सुनील जगताप यांच्यासह प्रकाश सोनटक्के, विजय गावंडे, हवालदार मनोज देवरे, अग्निशमन दलाचे अधिकारी महाजन, महाले आदींनी सहभाग नोंदवला. या वेळी आपत्ती निर्माण झाल्यास काय उपाययोजना कराव्यात, याची माहिती उपस्थितांना दिली.

बातम्या आणखी आहेत...