आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची हाैस फेडणाऱ्यांना आता महिला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडता आहे. राज्यात भाजपच्या सर्वाधिक महिला आमदार आहेत. राज्याच्या प्रमुखपदावर महिला बसणे ही महिलांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे महिलांचे सर्व प्रश्न सुटतील, असेही नाही. भाजपत महिला, पुरुष असा भेद नाही. व्यक्ती म्हणून प्रत्येकाकडे पाहिले जाते. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला न्याय देऊ शकेल अशीच व्यक्ती असावी, असे मत मांडत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
महिला मेळाव्यासाठी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. चित्रा वाघ म्हणाल्या की, राज्यातील सरकारला काेणताही धाेका नाही. सरकार याेग्य पद्धतीने काम करीत आहे. आजही काेणत्याही पक्षांपेक्षा भाजपकडे महिला आमदारांची संख्या अधिक आहे. आगामी विधानसभा, लाेकसभा निवडणुकीतही राज्यातून लाेकसभेच्या ४८ पैकी ४५ आणि विधानसभेच्या २८८ पैकी २०० पेक्षा अधिक जागांवर भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी महिला माेर्चाची भूमिका महत्त्वाची असेही त्यांनी स्पष्ट केले.
धर्मांतर बंदी कायद्याची गरज
लहान मुलींना लग्नासह विविध आमिष दाखवून पळवून नेले. त्यांचे धर्मांतर केले जाते. या प्रकाराला आळा बसण्यासाठी धर्मांतर बंदी कायदा असणे आवश्यक आहे. हिवाळी अधिवेशनात चर्चा हाेऊन लवकरच धर्मांतर बंदी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न होतील असेही त्या म्हणाल्या.
संजय राऊत नाही म्हणत संतापल्या
पत्रकारांनी मंत्री संजय राठाेड, शाळा बंद करण्याच्या निर्णयावर प्रश्न विचारल्यावर चित्रा वाघ संतापल्या. त्यांनी राज्यात असे प्रश्न काेणीही विचारले नाही. सर्व प्रश्नांचे उत्तरे माझ्याकडे असण्यासाठी मी काही संजय राऊत नाही.
संजय राऊत हे सर्वज्ञानी आहे. त्यांच्याकडे सर्व प्रश्नांचे उत्तरे असते अशा शब्दात त्यांनी टीका केली. या वेळी खासदार डाॅ. सुभाष भामरे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबन थाेरात, महापाैर प्रदीप कर्पे, भाजप महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण अध्यक्ष नारायण पाटील, जयश्री अहिरराव, सविता पगारे, मायादेवी परदेशी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.