आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:सिनेट सदस्यपदी ठाकूर यांची तिसऱ्यांदा‎ निवड, साळवे ग्रामस्थांनी केला सत्कार‎

शिंदखेडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र ‎ विद्यापीठ सिनेट निवडणुकीत विद्यापीठ विकास मंच विभाग ‎ प्रमुख नितीन लीलाधर ठाकूर सलग तिसऱ्यांदा विजय ‎ मिळवत हॅट‌्ट्रिक नोंदवली आहे. याबद्दल त्यांचा साळवे ‎ ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाच्या ‎ अध्यक्षस्थानी साळवे येथील माजी सरपंच मोतीलाल माळी ‎ उपस्थित होते.

त्यांचा साळवे येथील पोलिस पाटील शिवाजी ‎ पाटील यांनी शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी माजी सरपंच मोतीलाल माळी, सामाजिक कार्यकर्ते जयपाल गिरासे, ‎ नीलेश गिरासे, उमेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सोनू कुवर, ‎ नीलेश वाघ व प्रगतिशील शेतकरी विजय माळी, रामकृष्ण ‎ माळी आदी उपस्थित होते. ‎

बातम्या आणखी आहेत...