आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यालयीन:धुळ्यातील ‘त्या’ सावकाराची कारागृहात रवानगी

धुळे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध सावकारी प्रकरणी १४ दिवसापासून पोलिस कोठडीत असलेल्या राजेंद्र बंबला मंगळवारी न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानंतर आझाद नगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये त्यांना ट्रान्सफर करावे, असा अर्ज पोलिसांनी न्यायालयात दिला. त्याला न्यायालयाने परवानगी दिली. त्यामुळे मंगळवारची रात्र बंबने कारागृहात काढली. बंबला उद्या बुधवारी पुन्हा पोलिस अटक करतील.

अवैध सावकारी प्रकरणी राजेंद्र बंबच्या विरोधात जयेश दुसाणे या तरुणाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेत वर्ग झाला आहे. याच गुन्ह्यात बंबला अटक झाली होती. नियमानुसार संशयित आरोपीला १४ दिवसापर्यंत पोलिस कोठडीत ठेवता येते. ही मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बंबला न्यायालयात उभे केले. न्या. ए. डी. क्षीरसागर यांच्या समक्ष कामकाज झाले. सरकारतर्फे सरकारी वकील पराग मधुकर पाटील यांनी बाजू मांडली. त्यानंतर राजेंद्र बंब याच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश देण्यात आले. दरम्यानच्या काळात राजेंद्र बंब विरुध्द तीन गुन्हे दाखल झाले आहे. त्यापैकी आझाद नगर पोलिस ठाण्यात दोन व शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

पोलिस आज ताब्यात घेणार
न्यायालयाने बंबला पोलिसांच्या ताब्यात देण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार उद्या बुधवारी आझाद नगर पोलिस त्याला ताब्यात घेतील. त्यामुळे मंगळवारची रात्री बंबला कारागृहात काढावी लागली.

‘अटकपूर्व’वर कामकाज
इतर तीन गुन्ह्यांमध्ये अटक करु नये यासाठी राजेंद्र बंबतर्फे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल झाला आहे. त्यांच्या अर्जावर अभिप्रायसाठी मुदत मागण्यात आली होती. त्यावर उद्या बुधवारी कामकाज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...