आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:मनपा सफाई कर्मचाऱ्यास प्रशासन बजावणार नोटीस

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत सार्वजनिक शौचालयाची तक्रार करण्यासाठी नागरीक आले असता, त्यांच्याशी मनपा सफाई कामगार, शौचालयाचा कंत्राटदार यांनी वाद घातला, त्याचवेळी स्वच्छता निरीक्षकांशीही वाद घातला आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून कर्मचारीला नोटीस बजावण्यात येणार आहे.

पालिकेने शहरातील सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राट दिले आहे. मात्र यानंतरही नागरीकांच्या यासंदर्भात तक्रारी होत आहे. तर महासभेत नगरसेवकांनीही मोठया प्रमाणात सार्वजनिक शौचालयांच्या दुरावस्थेबद्दल तक्रारी केल्या होत्या. तर सोमवारी जुन्या महापालिकेत नागरीक शौचालयांची तक्रार करण्यासाठी आले असता, यावेळी मनपा सफाई कर्मचारी हाशिम शेख व कंत्राटदारांंनी नागरिकांशी वाद घातला. स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील यांच्याशीही वाद घातला. याप्रकरणी महापालिका प्रसासन सफाई कर्मचारीला नोटीस देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...