आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणांकन:अतिरिक्त वेळेचा फायदा, लिखाणाचा सराव कमी झाल्याने गुणांकन घटले

धूळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कला शाखा : उत्तीर्णांचे प्रमाण वाढले, गुण कमी
कोरोनानंतर विद्यार्थ्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांचा अतिरिक्त ताण कमी व्हावा म्हणून त्याच शाळेत परीक्षा केंद्र दिल्याने फायदा झाला. विद्यार्थ्यांचा लेखन सराव कमी झाला होता. यंदा अतिरिक्त वेळ देण्यात आला.

त्यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले. मात्र, लेखन सराव कमी झाला असल्यामुळे गुणांकन काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यातही कला शाखेतील विद्यार्थ्यांचे गुणांकन कमी झाले आहे. आता निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी विधी, पत्रकारिता, समाजकार्य सारख्या अभ्यासक्रमांच्या संधी आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची विद्यार्थ्यांना संधी असल्याचे निवृत्त प्रा. बी. ए. पाटील यांनी सांगितले.

विज्ञान : अभ्यासक्रम कमी केल्याने फायदा
विज्ञान शाखेसाठी ७०-३० चा पॅटर्न होता. या पॅटर्ननुसार ३० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येते. मात्र, यावर्षी प्रात्यक्षिकांची संख्या कमी करण्यात आली. त्यामुळे एन वेळेस धावपळ उडाली नाही. तसेच अभ्यासक्रम कमी झाल्यामुळे सरावासाठी संधी मिळाली.

जेवढे प्रात्यक्षिक निश्चित केले होते. तेवढे शंभर टक्के घेण्यात आले. विद्यार्थ्यांवरील दडपण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्याने त्याचा फायदा झाला. त्यामुळे विज्ञान शाखेचा निकाल वाढला. ज्या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत होते त्याच शाळेत परीक्षा झाल्याने त्यांना असुरक्षित वाटले नाही. विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्रासह आदी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची संधी असल्याची माहिती एम.के. शिंदे, महाविद्यालयाचे प्रा. तुषार देसले म्हणाले.

वाणिज्य : काठिण्य पातळी कमी केल्याने लाभ
वाणिज्य शाखेतील बुक किपिंग आणि अकाउंट यासारखे विषय अवघड वाटतात. मात्र, यावर्षी विद्यार्थ्यांना याविषयात चांगले गुण मिळाले. शासनाच्या धोरणानुसार २५ टक्के अभ्यासक्रम कमी केल्याचा फायदा झाला.

लिखाणासाठी अर्धातास वाढीव मिळाला, शाळांमध्ये परीक्षा केंद्र असल्याने भीती कमी झाली होती. प्रश्नपत्रिका अधिकाधिक सुटसुटीत आणि काठिण्य पातळी कमी केल्यामुळे फायदा झाला. आता वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना एमबीए, सीए, बीबीए, बीबीएम सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. याशिवाय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जीएसटी डिप्लोमा, अॅक्युअरचा डिग्री कोर्स सुरू केला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे जो. रा. सिटी हायस्कूलचे प्रा. विकास अमृतकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...