आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारीत मतदान:बाजार समिती निवडणुकीच्या घोषणेने उडेल राजकीय धुरळा

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मुदत संपलेल्या व प्रशासक असलेल्या २८१ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डाॅ. जगदीश पाटील यांनी ही माहिती दिली. त्यानुसार धुळ्यासह साक्री, शिंदखेडा व शिरपूर बाजार समितीची निवडणूक जानेवारी २०२३ मध्ये होईल. त्यासाठी मतदार सूची तयार करण्यापासून निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

गेल्या वर्षापासून धुळे बाजार समितीवर प्रशासक मंडळ आहे. चार दिवसांपूर्वी जुने प्रशासक मंडळ बरखास्त करून नवीन मंडळाची नियुक्ती झाली हाेती. तसेच साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुका बाजार समितीचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर आता निवडणूक कार्यक्रमांची घाेषणा झाली. त्यानुसार चारही बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. प्राधिकरणाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हा व तालुका उपनिबंधकांकडून संबंधित बाजार समिती क्षेत्रातील प्राथमिक कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था, ग्रामपंचायत सदस्य मतदार असल्याने त्यांची सूची २७ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहे. तसेच आडते, हमाल, ताेलाईकर हे बाजार समितीचे मतदार असल्याने १ नाेव्हेंबर राेजी मतदारांची यादी जाहीर सादर केली जाईल. त्यानंतर १४ नाेव्हेंबरला प्रारूप व ७ डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. तसेच २९ जानेवारीला मतदान तर ३० जानेवारीला मतमाेजणी हाेईल. पण निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल हाेण्याची शक्यता आहे.\

बातम्या आणखी आहेत...