आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची शक्यता:पावसाचे रविवारी आगमन शक्य, तापमानही घसरले

धुळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ११ व १२ जूनला पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली असून, उष्णतेच्या झळा जाणवत असून, उकाडा वाढला आहे. पण येत्या रविवारी किंवा सोमवारी पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच पाऊस झाल्यावर तापमान ३५ अंशांवर येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

जिल्ह्यासह शहरात पाऊस लांबणीवर पडल्याने पुन्हा वातावरणात बदल झाला आहे. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवतो आहे. उन्ह व उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तापमान ३८ अंशांवर स्थिरावले आहे. ही स्थिती शनिवारपर्यंत कायम असेल. त्यानंतर रविवारी कमाल तापमान ३५ व किमान २६ अंशावर येईल.

बातम्या आणखी आहेत...