आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलक‎ हटवले:महापालिका इमारती‎ समोरील बॅनर हटवले‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या नव्या इमारतीच्या‎ समोर अनेकांनी शुभेच्छा देणारे‎ फलक व बॅनर लावले होते. ते‎ लावताना परवानगी घेण्यात आली‎ नव्हती. त्यामुळे प्रशासनाने‎ गुरुवारी रात्री साडेआठ ते नऊ‎ वाजेच्या सुमारास सर्व फलक‎ हटवले.‎ शहरातील प्रमुख रस्ते व‎ चौकात शुभेच्छा देणारे अनेक‎ फलक झळकले आहे. त्यातही‎ झाशी राणी पुतळा चौक, मनपाची‎ नवीन व जुनी इमारत या ठिकाणी‎ फलकाचे प्रमाण जास्त आहे.‎ मनपा इमारतीच्या परिसरात बॅनर,‎ फलक लावता येणार नाही, असा‎ ठराव करण्यात आला होता. तसा‎ फलकही महापालिकेच्या‎ प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आला‎ आहे.

त्यानंतरही या ठिकाणी बॅनर‎ लावण्यात आले होते. याविषयी‎ तक्रार झाली होती. तसेच एक‎ फलक थेट महापालिकेच्या‎ आवारात लावण्यात आला हाेता.‎ त्यामुळे सकाळपासून हा विषय‎ चर्चेचा होता. त्यानंतर‎ महापालिकेने फलकावर कारवाई‎ करण्याचा निर्णय घेतला.

तसेच‎ बंदोबस्तासाठी पोलिस‎ प्रशासनाला पत्र दिले. अतिक्रमण‎ विभागाला महापालिका‎ आवारासह प्रवेशद्वाराजवळ‎ असलेले फलक काढण्याची‎ सूचना केली. पोलिस बंदोबस्त‎ मिळाल्यावर रात्री मनपा‎ इमारतीच्या समोरील फलक‎ हटवण्याला प्रारंभ झाला.‎ उशिरापर्यंत फलक हटवण्याचे‎ काम सुरू होते. दरम्यान,‎ शहरातील अन्य भागातील बॅनरही‎ हटवले जाण्याची शक्यता आहे.‎ महापालिकेची परवागनी‎ घेतल्यावरच बॅनर लावावे, असे‎ आवाहन मनपाने केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...