आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नसराई:विवाहांचा उडणार बार; यंदा‎ जूनपर्यंत असतील 57  मुहूर्त‎

तऱ्हाडी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुलसी विवाहाला ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ‎ होणार आहे. त्यानंतर लगेच विवाह‎ सोहळ्यांची धामधूम सुरू होईल. यंदा‎ लग्नसराईला २६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार‎ असून २८ जूनपर्यंत लग्नाचे तब्बल ५७ मुहूर्त‎ आहे. विवाह सोहळ्यांवर २०२० व २०२१‎ असे दोन वर्षे कोरोनाचे संकट हाेते. आता‎ कोरोनाचे संकट कमी झाल्याने प्रशासनाने‎ सर्व निर्बंध हटवले आहे. त्यामुळे विवाह‎ सोहळे धूमधडाक्यात होतील. त्यासाठी‎ तयारीही सुरू झाली आहे. वधू पित्याकडून‎ मंगल कार्यालय, केटरर्स, डेकोरेशनची नोंदणी‎ केली जाते आहे. त्याचबरोबर बाजारातही‎ उलाढाल वाढली आहे.‎

यंदा नोव्हेंबरमध्ये सर्वात कमी अर्थात‎ चारच विवाह मुहूर्त आहे. तसेच मे महिन्यात‎ सर्वाधिक १४ मुहूर्त आहे. डिसेंबरमध्ये ८,‎ जानेवारीत ४, फेब्रुवारीत ११, मार्चमध्ये ५, मे‎ महिन्यात १४ तर जून महिन्यात १२ विवाह‎ मुहूर्त आहे. नोव्हेंबरमध्ये २६, २७, २८, २९‎ तारखेला, डिसेंबरमध्ये २, ४, ९, १४, १६, १७,‎ १८ तारखेला, जानेवारीत १८, २६, २७, ३१‎ तारखेला, फेब्रुवारीत ६, ७, १०, ११, १४, १६,‎ २२, २३, २४, २७, २८ तारखेला, मार्चमध्ये ८,‎ ९, १३, १७, १८ तारखेला, मे महिन्यात २, ३,‎ ४, ७, ८, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०‎ तारखेला, जूनमध्ये १, ३, ७, ८, ११, १२, १३,‎ १४, २३, २६, २७, २८ तारखेला विवाह मुहूर्त‎ आहे. कोरोनामुळे केटरिंग व्यवसाय दोन वर्ष‎ मंदीत होता. आता कोरोनाचे कोणतेही निर्बंध‎ नाही. त्यामुळे यंदा लग्नसराईचा हंगाम‎ चांगला होण्याची शक्यता आहे.‎

बातम्या आणखी आहेत...